जळगाव समाचार डेस्क;
लग्नकार्यातून घरी परतणाऱ्या यावल तालुक्यातील अमोदा येथील दाम्पत्याच्या दुचाकी वाहनाला एसटी बसने मागून धडक दिल्याने झालेल्या जबर अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रावेरमध्ये घडली आहे. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करुन बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.(Jalgaon)
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बंभाडा (मध्य प्रदेश) येथून दुचाकीने (एमएच १४, एक्यू – ११९६) लग्नसमारंभ आटोपून सायंकाळी यावल तालुक्यातील अमोदा येथील संदिप पाटील व त्यांच्या पत्नीसह परत आमोदे येथे घरी परतत होते. दरम्यान येथील बालाजी टोल काट्याजवळ अहिरवाडी कडून रावेरकडे येणारी बस (एम.एच.१४ बीटी ३९१६) ने त्यांच्या दुचाकीला मागून जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेल्या आरती संदिप पाटील (३५) या खाली पडल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत संदिप पाटील यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून बस चालकावर गुन्हा दाखल करत शेख तौफिक शेख रफिक (रा. फैजपूर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.