Sunday, December 22, 2024
Homeक्रीडा“यशोगाथा” ज्याच्यामुळे लाजिरवाणा पराभव झाला होता, आता त्याच खेळाडूची जिद्दीने टीम इंडियात...

“यशोगाथा” ज्याच्यामुळे लाजिरवाणा पराभव झाला होता, आता त्याच खेळाडूची जिद्दीने टीम इंडियात निवड…

जळगाव समाचार डेस्क | क्रिडा

बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. या मालिकेतील पहिला सामना १९ सप्टेंबर रोजी चेन्नईमध्ये होणार आहे. संघात अनेक अनुभवी खेळाडूंनी पुनरागमन केले आहे, तर काही नवोदित खेळाडूंनाही संधी मिळाली आहे. विशेषतः यश दयाल या गोलंदाजाचे संघात समावेश हा चर्चेचा विषय ठरला आहे.

यश दयालने आयपीएलमध्ये आलेल्या संकटांवर मात करून भारतीय संघात स्थान मिळवले आहे. आयपीएल २०२३मध्ये कोलकाता नाइट रायडर्सच्या रिंकू सिंहने यशच्या एका ओव्हरमध्ये सलग पाच षटकार मारले होते. त्यानंतर यशच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते, मात्र त्याने हार मानली नाही. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यश दयालने आपल्या करिअरमध्ये मोठी झेप घेतली.

गुजरात टायटन्सने यशला संघातून रीलीज केल्यानंतर त्याला मोठा धक्का बसला होता. त्याचा परिणाम असा झाला की त्याचे वजन ५-६ किलोने घटले. मात्र, या अपयशानंतरही यशने प्रयत्न सुरूच ठेवले आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला ५ कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात सामील करून घेतले. सध्या यश दुलीप ट्रॉफीमध्ये उत्तम कामगिरी करत आहे आणि आता बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळाले आहे.

टीम इंडिया:
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page