जळगावः जळगावनगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानतर्फे कान्हदेशाचे सांस्कृतिक व आध्यात्मिक वैभव असलेल्या श्रीराम रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर आणि वहनाच्या रंगरंगोटीला सुरुवात झाली आहे. २ नोव्हेंबर, कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून वहनोत्सव सुरू होईल. तर १२ नोव्हेंबर, कार्तिक शुक्ल एकादशीला रथोत्सव होईल.
ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान (रामपेठ) जळगावचे विद्यमाने अवघ्या कान्हदेशाचे सांस्कृतिक, अध्यात्मिक वैभव असलेला व गेली १५२ वर्षे अव्याहतपणे होत असलेला श्रीराम स्थोत्सव यंदाही उत्साहात होत आहे. आज दि.२ नोव्हेंबरपासून वहनोत्सवास प्रारंभ होत आहे. तसेच १२ नोव्हेंबर या कार्तिकी प्रबोधिनी एकादशीच्या पावन दिनी श्रीराम स्थोत्सव होणार आहे. या रथोत्सवाच्या दर्शनाकरिता महाराष्ट्रातील विविध भागातून हजारोंच्या संख्येने भाविक यानिमित्त जळगावला येत असतात.
परंपरेप्रमाणे कार्तिक शु. प्रतिपदा ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत दि. १५ नोव्हेंबरपर्यंत हा उत्सव संपन्न होईल व या उत्सवात प्रतिदिनी रोज सकाळी पहाटे ५ वाजता काकडा आरती, प्रभू रामरायांची पूजा, अभिषेक, विष्णूसहसहखनाम तुळसी अर्चना, सकाळी ७.०० वाजता मंगलारती दुपारी ११.३० ते १२, माध्यन्ह पूजा, नैवेद्य आरती, संत ज्ञानेश्वर महाराज
हरिपाठ, संध्याकाळी ५ते ६ नित्यनेमाने चक्री भजन, संध्याकाळी ६ ते ६.३० संध्यापूजा, धुपारती संध्याकाळी ७ वाजता श्रीराम मंदिरापासून वहन व दिंडीस प्रारंभ होईल. नित्य वहन प्रस्थान आरती परंपरेने श्रीराम मंदिर संस्थानचे विद्यमान गादीपती ह.भ.प.मंगेश महाराज यांच्या हस्ते होईल. २ नोव्हेंबर कार्तिक शुद्ध बळी प्रतिपदा दिनी पहाटेची उपचार विधी होऊन सकाळी ११ वा. प्रभू रामरायांचे उत्सवमुर्तीस पालखीत विराजमान करून निमखेडी येथील श्रीराम मंदिरात जाऊन श्री सडुरू कुवरस्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भजन, पूजन, आरती होऊन दुपारी ४ वाजता पालखी जळगाव श्रीराम मंदिरात येईल.