जळगाव समाचार डेस्क;
गेली काही वर्ष उद्धव ठाकरे यांच्यासाठी खूप कठीण काळाचा अनुभव देणारी गेली. त्यात सर्वप्रथम पक्षफुटी, नंतर सरकार पडणे, अश्या बऱ्याच गोष्टी त्यांनी अनुभवल्या. मात्र लोकसभा निवडणुकीत उत्तम कामगिरी करत त्यांनी पुनरागमनाची जणू काही जोरदार घोषणाच केली. या सगळ्यात आज केंद्रीय निवडणूक आयोगाने एक मोठा सकारात्मक निर्णय त्यांच्या बाजूने दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर हा निर्णय आल्याने शिवसेना पक्षाला नवी उमेद मिळाल्याचे चिन्ह आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षनिधी स्वीकारण्यास परवानगी दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला निधी स्वीकारता येणार आहे. त्यामुळे पक्षाला विधानसभेत संपूर्ण जोमाने कां करता येणार असल्याने पक्षातील नेत्यांचे म्हणणे आहे. शरद पवार यांच्या मागणीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनीही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. त्यास आज मंजुरी मिळाली.