शहरात शिवसेनेच्या नवीन कार्यालयाला भूताने पछाडलं? कार्यकर्त्यांसाठी ना. गुलाबराव पाटलांचे विशेष आवाहन…

 

जळगाव समाचार | २० मे २०२५

जळगाव शहरातील पांडे चौक परिसरात शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे नवीन मध्यवर्ती कार्यालय सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ४ जून रोजी या कार्यालयाचे उद्घाटन होणार असले तरी त्याआधीच “या ठिकाणी भूत आहे” अशी अफवा पसरली आहे. यामुळे काही कार्यकर्ते घाबरले असून कार्यालयात जाण्यास नकार देत आहेत.

ही भीती लक्षात घेऊन जळगावचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेतला. “ही केवळ अफवा आहे. कोणत्याही अंधश्रद्धेला बळी पडू नका,” असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच, “उद्घाटनानंतर मी स्वतः या कार्यालयात नियमित बसणार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच शहरात हे नवीन कार्यालय उभारण्यात आले असून ४ जूनला त्याचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. आता या उद्घाटनानंतर कार्यकर्ते या कार्यालयात उपस्थित राहतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here