जळगाव समाचार | २२ फेब्रुवारी २०२६
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर Shikhar Dhawan याने आपल्या वैयक्तिक आयुष्यात नवी इनिंग सुरू करत सोफीसोबत विवाहबंधनात अडकत सात फेरे घेतले. गेल्या आठवड्यापासून सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आले होते. अखेर कुटुंबीय व जवळच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. लग्नसोहळा खासगी स्वरूपात आयोजित करण्यात आला होता. विवाह सोहळ्यात व्हाइट आणि आयवरी थीम ठेवण्यात आली होती, ज्यामुळे संपूर्ण वातावरण राजेशाही भासत होते.
लग्नाच्या दिवशी शिखर धवनने पांढऱ्या रंगाची आकर्षक एम्ब्रॉयडरी शेरवानी परिधान केली होती. डोक्यावर राजेशाही पगडी आणि गळ्यात पन्ना माळ परिधान केल्याने त्याचा लूक एखाद्या राजकुमाराप्रमाणे उठून दिसत होता. वधू सोफीने प्रसिद्ध फॅशन डिझायनर Manish Malhotra यांच्या कलेक्शनमधील आयवरी आणि ऑरेंज रंगाचा थ्री-डी फुलांनी सजलेला लहंगा परिधान केला होता. मोत्यांनी भरतकाम केलेला ब्लाउज, काउल टॅसल आणि जुळणारा हेड वेल यामुळे तिचा संपूर्ण पेहराव देखणा आणि आकर्षक दिसत होता.
या विवाहसोहळ्यास भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू Yuzvendra Chahal देखील उपस्थित होता. चहलने सोशल मीडियावर नाचतानाचा व्हिडिओ शेअर करत “माझ्या मित्राचे लग्न आहे,” असा खास संदेश लिहिला आणि नवदाम्पत्याचे छायाचित्रेही पोस्ट केली. दरम्यान, शिखर धवनचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी त्याने २०१२ साली Aesha Mukerji यांच्यासोबत विवाह केला होता; मात्र २०२३ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यांना एक मुलगा असून तो सध्या आईसोबत राहतो. त्यानंतर सोफीसोबतची मैत्री प्रेमात रूपांतरित झाली आणि काही वर्षांच्या ओळखीनंतर दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. सोफी ही आयर्लंडमध्ये वास्तव्यास असून प्रोडक्ट कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.

![]()




