क्रीडा, जळगाव समाचार डेस्क;
भारतीय पुरुषांचा क्रिकेट संघ T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यात यशस्वी झाला आहे. त्यामुळे पुन्हा सर्वांच्या विश्वचषक भारतीय संघच जिंकेल अशी आस सर्वांनाच लागली आहे. मात्र अंतिम सामन्यात त्यांना दक्षिण आफ्रिकेकडून चांगलीच टक्कर मिळणार याबाबत कुठलेही दुमत नाही.
मात्र या दरम्यान भारतीय महिला संघाचा आज आफ्रिकेच्या महिला संघासोबत होत असलेल्या कसोटी सामन्यात टीम चेन्नई येथे होत असलेल्या एकमात्र कसोटी सामन्याच्या मालिकेत आज सकाळी कर्णधार हरमनप्रीत ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि तो निर्णय शेफाली वर्मा आणि स्म्रिती मानधना या जोडीने यशस्वी ठरवला.
शेफालीचे द्विशतक…
शेफालीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. तिने ताबडतोब फलंदाजी करतांना १९७ चेंडूत २०५ धावा केल्या, या खेळी दरम्यान तिने आठ षटकार तर 23 चौकार ठोकले. तिच्या सोबतीने उपकर्णधार स्म्रिती मानधना हिने १६१ चेंडूत १४९ धावांची खेळी करून शेफाली ची उत्तम साथ दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल २९२ धावांची भागीदारी केली. आतापर्यंत भारतीय संघाची धाव संख्या 475 वर 4 गडी बाद अशी आहे.
https://twitter.com/i/status/1806631046529655269