जळगाव समाचार डेस्क | २२ डिसेंबर २०२४
जळगाव शहरातील भुसावळ रोडवरील दोन हॉटेल्समध्ये कुंटणखाना चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी छापा टाकून तीन जणांना अटक केली, तसेच एका महिलेची सुटका करून एक बांगलादेशी तरुणीला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी हॉटेल चित्रकूटमध्ये डमी ग्राहक पाठवून तपास केला, ज्यात हॉटेलमध्ये देह व्यापार चालवला जात होता. हॉटेल काउंटरवरून 1500 रुपये आणि मोबाईल जप्त करण्यात आले. एका महिलेने पोलिसांना सांगितले की, हॉटेल व्यवस्थापक विजय तायडे याच्या मार्फत ती हॉटेलमध्ये आणली गेली. त्यानंतर, पोलिसांनी हॉटेल यशमध्ये छापा टाकून बांगलादेशी तरुणीला पकडले.
पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापक विजय तायडे, निलेश गुजर, चेतन माळी आणि बांगलादेशी तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईत पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सपोनि गणेश वाघ, गोपाल पाटील, चंद्रकांत पाटील, सोनाली चव्हाण, गणेश ठाकरे आणि इतर पोलीस अधिकारी समाविष्ट होते.