पंचायती राज मंत्र्यांच्याच तालुक्यात महिला सरपंच अपात्र; विभागीय आयुक्तांची मोठी कारवाई…

 

जळगाव समाचार डेस्क | ३१ ऑगस्ट २०२४

 

जामनेर तालुक्यातील वाकोद ग्रामपंचायतीच्या सरपंच सरला संजय सपकाळे यांना उपसरपंचपद रिक्त ठेवण्याच्या कर्तव्य कसुरीमुळे सरपंचपदावरून अपात्र घोषित करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी या निर्णयाचा आदेश जारी केला असून, या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, वाकोद ग्रामपंचायतीचे उपसरपंच रविंद्र भगवान भगत यांची २०२१ साली कायदेशीर निवड झाली होती. मात्र, सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार २९ मे २०२३ रोजी त्यांना पदावरून अपात्र करण्यात आले. त्या दिवसापासून उपसरपंचपद रिक्त होते.
नियमांनुसार, उपसरपंचपद रिक्त झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत ते भरले जाणे आवश्यक होते. मात्र, सरपंच सरला सपकाळे यांनी कर्तव्यात कसूर केली आणि आठ महिने उलटूनही उपसरपंचपद भरले गेले नाही. यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विभागीय आयुक्तांकडे अहवाल पाठविण्यात आला, ज्यामध्ये सरपंच सरला सपकाळे यांना अपात्र ठरविण्याची शिफारस करण्यात आली.
या अहवालाच्या आधारे विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी सरला संजय सपकाळे यांना सरपंचपदावरून अपात्र घोषित केले. ही कारवाई मुळ तक्रारदार अर्चना दिपक गायकवाड यांच्या वतीने ॲड. विश्वासराव भोसले यांनी केली. या निर्णयामुळे जामनेर तालुक्यात खळबळ माजली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here