श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्सव उत्साहात साजरा

 

जळगाव समाचार | २० ऑगस्ट २०२५

महाराष्ट्र नाभिक महामंडळ संचलित नाभिक हितवर्धक संघ, जळगाव शहर संघटनेतर्फे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्सव संत गाडगेबाबा उद्यान येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आज बुधवार, 20 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन, माल्यार्पण व आरती करण्यात आली. यावेळी श्री संत महाराजांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकण्यात आला तसेच मान्यवरांनी आपल्या मनोगतातून संतांच्या कार्याचा गौरव केला. श्री गुरुमाऊली श्री स्वामी समर्थ केंद्र, दिंडोरी यांच्या वतीने पुरविण्यात आलेल्या कदंबाच्या रोपाचे वृक्षारोपण श्री प्रभाकर खर्चे, वसंत पाटील, हितेश चिरमाडे यांच्यासह समाजबांधवांनी केले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रदेशाध्यक्ष किशोर सूर्यवंशी, जीवा सेना प्रदेशाध्यक्ष देविदास फुलपगारे, जिल्हाध्यक्ष किशोर वाघ, माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, गोविंद साळुंखे, महारू इसे, बापू सूर्यवंशी, राजकुमार महाले, अनिल निकम, मनीष कुवर, संजय चित्ते, पद्माकर निकम, अरुण निकम, श्याम फुलपगारे, सुनील जगताप, अनिल सूर्यवंशी, अशोक वसाने, सुनील पवार, अरुण वसाने, नितीन जगताप, राजकुमार गवळी, पांडुरंग सोनगिरे, प्रकाश सोनगिरे, जगदीश निकम, छगनराव सैंदाणे, शिवाजी चव्हाण, जितेंद्र निकम, नितीन खोंडे, मंगल खोंडे, सुदाम कोरडे, युवराज खोंडे, नारायण ठाकरे, सुभाष कुवर, सुरेश कुवर, देविदास ठाकरे, छगन सूर्यवंशी, नरेंद्र कोरडे, ललित ठाकरे, दत्तू सोनगिरे, विजय सैंदाणे, मोहन सोनगिरे, रवींद्र सोनगिरे, प्रवीण सोनवणे, किरण सोनवणे, योगेश निकम, संजू सांनसे, भगवान शिवरामे, गणेश सोनवणे, रवींद्र खोंडे, मनोहर सोनवणे, कुमार शिरनामे, राहुल जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. महिला मंडळातील संगीता गवळी, छाया कोरडे, विद्या महाले, मीना पवार, मंगला ईसे, आशा चित्ते, छाया निकम, सरला सूर्यवंशी, वर्षा निकम, मीराताई सोनवणे आदी भगिनींनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष कुवर यांनी केले तर आभार प्रदर्शन शहर सचिव अनिल निकम यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here