(विक्रम लालवणी), प्रतिनिधी पारोळा
पारोळ्यात तहसिलदार कार्यालयात आमदार चिमणराव पाटील व पारोळा तहसीलदार डॉ उल्हासराव देवरे यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी निराधार योजना व इतर योजना संदर्भात समितीची बैठक घेण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे काम अनेक दिवसांपासून रेंगाळत पडले होते, याची दखल घेत आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि. १९ रोजी दुपारी तीन वाजता तहसीलदार कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेची बैठक पार पडली. सदर बैठकसाठी डॉ. दिनकर पाटील, चतुर पाटील, राजेंद्र कासार, विरेंद्र सरदार हे अशासकीय सदस्य व गट विकास अधिकारी किशोर शिंदे हे उपस्थित होते. या बैठकीस तहसीलदार डॉ. उल्हासराव देवरे, संजय गांधी योजना प्रमुख नायब तहसीलदार धनंजय देशपांडे, अ.का. शीतल गांगुर्डे, अनिल परदेशी, गणेश नाईक, शशिकांत परदेशी, अंबादास ठाकूर यांनी आयोजन करून कामकाज पार पाडले. सदर बैठकीत मंजूर नामंजूर त्रुटी बाबतीत निर्णय घेण्यात आलेल्या माहिती बाबत तक्ता दि. १४ रोजीच्या बैठकीत श्रवणबाळ योजनांचे सादर करण्यात आलेल्या अर्जांची तपासणी करून प्रकरणे तपासणी करण्यात आली.
योजनेचे नाव
श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना एकूण अर्ज २८१, मंजूर ७१, नामंजूर ८५, त्रुटी १२५ तर
संजय गांधी योजनेत एकूण अर्ज २४६, मंजूर १५२, नामंजूर ४६, त्रुटी ४८,
इंदिरा गांधी वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना एकूण अर्ज ५३, मंजूर 27, नामंजूर 2, त्रुटी २४,
इंदिरा गांधी विधवा वेतन योजना एकूण अर्ज ३८, मंजूर ३१, नामंजूर 2, त्रुटी 5
इंदिरा गांधी अपंग वेतन योजना 0 अशा प्रकारे प्रकरणे मंजूर नामंजूर करण्यात आले आहेत.

![]()




