जालना, जळगाव समाचार डेस्क;
जालना जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. (Accident) मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गावर (Samruddhi Expressway) झालेल्या भीषण अपघातात दोन कारच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरहून मुंबईकडे येत असलेल्या इर्टिका कारला डिझेल भरून चुकीच्या बाजूने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की कारमध्ये बसलेले प्रवासी रस्त्याच्या कडेला पडले.
घटनेची माहिती मिळताच जालना पोलिसांनी घटनास्थळ गाठून क्रेनच्या सहाय्याने दोन्ही गाड्या बाहेर काढल्या. जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील कडवंची गावाजवळ हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

![]()




