Monday, December 23, 2024
Homeविधानसभा निवडणूकअफवा पसरवू नका; उद्यापासून मैदानात दणदणीत प्रचार सुरू करणार: डॉ. संभाजीराजे पाटील

अफवा पसरवू नका; उद्यापासून मैदानात दणदणीत प्रचार सुरू करणार: डॉ. संभाजीराजे पाटील


जळगाव समाचार डेस्क | ४ नोव्हेंबर २०२४

एरंडोल, कासोदा, भडगाव मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार डॉ. संभाजीराजे पाटील यांनी आपल्या विरोधकांना कडक इशारा देत अफवा पसरविणाऱ्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. “अफवा पसरवू नका, मी उद्यापासून दणदणीत प्रचाराला सुरुवात करणार आहे,” असे ठामपणे सांगून, त्यांनी आपल्या मतदारसंघात सिलिंडर चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने निवडून देण्याचे आवाहन केले आहे.

डॉ. संभाजीराजे पाटील यांनी सांगितले की, त्यांच्या उमेदवारीचे मुख्य ध्येय सर्वसामान्य जनतेला आधार देणे आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधणे हे आहे. “या वेळी मतदारसंघात निश्चित बदल होणार असून, मतदारसंघाचा विकास घडवून आणणे हे माझे ध्येय आहे,” असे ते म्हणाले.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page