जळगाव समाचार | ६ नोव्हेंबर २०२५
पाच नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो.सालाबादाप्रमाणे समर्थ कला बहुउद्देशीय संस्था जळगाव.अनेक वर्षांपासून जळगाव रंगभूमीशी राज्य नाट्य स्पर्धा नाटक, एकांकिका, पथनाट्य, एकपात्री नाटक,बालनाट्य, महानाट्य अशा अनेक प्रकारांनी जुळलेली आहे
समर्थ कला संस्थेच्या वतीने बालनाट्य प्रशिक्षण शिबिर.इतर विविध स्पर्धा, अटल करंडक एकांकिका स्पर्धा प्राथमिक फेरी,अशा अनेक गोष्टींचे आयोजन करून अनेक बालकलाकारांना नाटकाबद्दल प्रशिक्षण व एकांकिका स्पर्धेसंबंधी अनेक नवं युवकांना हक्काचं व्यासपीठ समर्थ कला संस्था उपलब्ध करून देत असते.
मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून संस्थेने यापूर्वी सादर केलेल्या नाटकातील प्रवेश सादर करत संस्थेच्या कलाकारांनी अनेकांची मने जिंकली.प्रत्यक्ष नाटक कसं जगावं,रंगमंचातून होणारे नवनवीन प्रयोग, प्रत्येक कलाकार संस्थेच्या माध्यमातून करत असतो
या दिवसाचे औचित्य साधून विशाल जाधव रूपांतरित लाल चिखल या एकांकिकेतील प्रवेशाचे प्रात्यक्षिक सादर करताना कोमल नेमाडे ,योगेश लांबोळे ,राहुल निकम, सागर सदावर्ते, भीमराव सपकाळे ,महेश कोळी, रोहिणी निकुंम, पूर्वा जाधव, समर्थ जाधव,इत्यादींनी भूमिका केली

![]()




