जळगाव समाचार | २९ ऑगस्ट २०२५
श्री साई ग्रुप गणेश उत्सव मित्र मंडळ, यावल रोड, चोपडा यांच्या वतीने आयोजित “साई-आराध्य” गणेशोत्सव 2025 मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कुणाल जगताप आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून गेल्या 16 वर्षांपासून हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जात असून यंदा मंडळाच्या १७व्या वर्षात ३५ फूट उंच मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील ही सर्वात उंच मूर्ती मानली जात असून ती बुरहानपूर येथील प्रसिद्ध गायत्री आर्ट्स यांनी साकारली आहे. तसेच पार्श्वभूमीचे काम मुंबई येथील परेल वर्कशॉप मधून करण्यात आले आहे.
या भव्य मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी पहिल्याच दिवसापासून भाविकांची मोठी गर्दी होत आहे. मंडळाच्या या उपक्रमाला शहरात आणि परिसरात विशेष प्रतिसाद मिळत असून “चोपड्याचा राजा” म्हणून या गणेशोत्सवाची ओळख निर्माण झाली आहे.