रावेर वनविभागाची कारवाई; सागवान लाकडाची तस्करी रोखली…

 

जळगाव समाचार डेस्क | २९ जानेवारी २०२५

वनविभागाने २७ जानेवारी रोजी रात्री तांदळवाडी गावाजवळ सागवान लाकडाची तस्करी करणारे वाहन पकडले. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

सावदा ते तांदळवाडी रस्त्यावर गस्त घालत असताना महिंद्रा बोलेरो पिकअप (MH-04-NF-7263) संशयास्पद आढळली. वनविभागाच्या पथकाने वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये २५ सागवानी लाकडाचे नग आढळून आले. वाहनचालक युवराज तायडे (वय ३५, रा. मांगलवाडी) यांच्याकडे लाकडाच्या वाहतुकीसाठी कोणताही परवाना नव्हता.

पकडलेल्या लाकडाचे मोजमाप १२२१ चौरस मीटर असून त्याची किंमत ४३,११६ रुपये आहे. तसेच वाहनाची किंमत ३ लाख ४५ हजार रुपये असून, दोन्ही जप्त करून पुढील चौकशीसाठी रावेर आगार डेपो येथे जमा करण्यात आले आहे.

ही कारवाई वनसंरक्षक निनू सोमराज, उपवनसंरक्षक जमीर शेख, विभागीय वनधिकारी आर. आर. सदगीर, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे व समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

ही मोहिम वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे, वनरक्षक सुपडू सपकाळे, जगदीश जगदाळे, वाहनचालक विनोद पाटील आणि विशेष पेसा वनरक्षक बवऱ्या बारेला, कियारसिंग बारेला, आकाश बारेला व निलेश बारेला यांच्या पथकाने राबवली. वनविभागाच्या सतर्कतेमुळे सागवान तस्करीचा मोठा प्रयत्न उधळला गेला असून, पुढील चौकशी सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here