जळगाव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात नाकाबंदी केली जात आहे. या नाकाबंदीमध्ये तहसील कार्यालयाच्या परिसरातील वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी दोन वाहनांमधून २ लाख २३ हजारांची रोकड तर बहीणाबाई चौकात ८५ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळकी सकाळच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा, पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड, राजू जाधव यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने नाकाबंदी करण्यात आली. यावेळी तहसील कार्यालय परिसरातून जात असलेल्या सफेद रंगाच्या क्रेटा कारची तपासणी करण्यात आली. यावेळी कुकरेजा नामक व्यक्तीकडून १ लाख ८८ हजार रुपये तर सायंकाळच्या कारवाईमध्ये जोहर खाटीक (रा. मेहरुण) याच्या कारची तपासणी केली. यावेळी त्याच्या खिशातून १ लाख ३५ हजारांची रोकड जप्त केली.