अडीच वर्षांपासून बंद ऑक्सिजन प्लॅन्ट सुरू करा – रोहिणी खडसे

मुक्ताईनगर ;- लाखो रुपये खर्च करून पाईप लाईन अभावी अडीच वर्षांपासून बंद ऑक्सिजन प्लॅन्ट सुरू करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केली आहे. रोहिणी खडसे यांनी आज मुक्ताईनगर उपजिल्हा रूग्णालयात भेट दिली त्यावेळी त्या बोलत होते.

कोविड काळात ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा भासत होता. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागत होते अशी परिस्थिती उद्भवू नये, म्हणून त्यावेळी शासनाने प्रमुख ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारणी करण्याचा निर्णय घेतला होता. मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे सुद्धा जिल्हा नियोजन समिती अंतर्गत 80 लाख रुपये निधी खर्च करून ऑक्सिजन प्लांट ची उभारणी केली. परंतु यातून फक्त प्लांटची उभारणी केली असुन त्यासाठी लागणाऱ्या पाईपलाईन व इतर यंत्रणेची उभारणी करण्यात न आल्याने हा प्लांट वापरा अभावी धूळखात पडला आहे. पाईपलाईन व इतर यंत्रणा उभारणी साठी निधी मंजुर नसल्याचे संबंधितांकडून सांगण्यात येते.

आता एवढा 70 ते80 लाख रुपये निधी खर्च करून हा ऑक्सिजन प्लांट शोभेची वस्तू बनून राहिला आहे. लवकरात लवकर पाईपलाईन व इतर आवश्यक यंत्रणेची उभारणी केली गेली नाही तर वापरा अभावी या प्लांटच्या मशिन कालबाह्य होऊन भंगारात काढण्याची परिस्थिती निर्माण होईल. तरी शासनाने तात्काळ पाईपलाईन व इतर यंत्रणेची उभारणी करून या ऑक्सिजन प्लांटचा उपयोग सुरू करावा जेणेकरून झालेला खर्च वाया जाणार नाही व आता प्लांट असुन सुद्धा बाहेरून ऑक्सिजन सिलेंडर आणण्यासाठी जो खर्च करावा लागत आहे, तो वाचेल असे रोहिणी खडसे यांनी सांगितले.

याप्रसंगी अतुल पाटील, प्रवीण पाटील, बाळा चिंचोले, निलेश भालेराव, बापू ससाणे, राहुल पाटील, भैय्या पाटील, प्रवीण पाटील, प्रदीप साळुंके, जुबेर अली, अयाज़ पटेल, एजाज़ खान. फिरोज़ सय्यद, इरफ़ान खान, वहाब खान, सलीम शेख आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here