जळगाव समाचार डेस्क | २७ जानेवारी २०२५
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत 26 जानेवारी रोजी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गरजू रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. भाजपा अल्पसंख्याक युवा मोर्चाच्या वतीने आयोजित या उपक्रमात माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॉ. गौरव प्रकाश महाजन, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्षा नूर मोहम्मद यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अल्पसंख्याक युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्फाक मुनाफ खाटीक, सोशल मीडिया संयोजक धीरज वर्मा, सरचिटणीस जावेद खाटीक, सरचिटणीस मोहसीन शाह, इरफान भाई शेख, वसीम कुरेशी, शाहिद मजीद शेख आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.