RBI चे मोठे पाऊल; यूपीआयनंतर यूएलआयची तयारी: ऑनलाइन कर्ज मिळवणे होणार सुलभ…

जळगाव समाचार डेस्क। २९ ऑगस्ट २०२४

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) ने भारतात डिजिटल पेमेंट क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणल्यानंतर, आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) डिजिटल क्रेडिट क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या तयारीत आहे. आरबीआय लवकरच युनिफाइड लेंडिंग इंटरफेस (यूएलआय) या नव्या प्रणालीची सुरुवात करणार आहे, ज्यामुळे कर्ज घेणे अधिक सोपे होईल.

आरबीआयने वित्तीय सेवांच्या डिजिटलायझेशनच्या यशाने प्रेरित होऊन यूएलआय आणण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये विशेषतः लहान आणि ग्रामीण भागातील लोकांना कर्ज मिळविणे अधिक सोयीचे होईल. या संदर्भात, गेल्या वर्षी आरबीआयने दोन राज्यांमध्ये फ्रिक्शनल लेस क्रेडिट देण्यासाठी तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मचा पायलट प्रोजेक्ट सुरू केला होता.

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, नव्या प्लॅटफॉर्मला ‘युनिफाइड लेंडिंग इंटरफेस’ (यूएलआय) असे नाव देण्याचा प्रस्ताव आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लँडर्सपर्यंत अनेक राज्यांच्या जमिनीच्या नोंदी आणि इतर डिजिटल माहितीचा अखंड आणि संमती-आधारित प्रवाह सुलभ केला जाणार आहे. यामुळे लोकांना ऑनलाइन झटपट कर्ज मिळविणे आता सहज शक्य होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here