जळगाव समाचार डेस्क| १८ ऑगस्ट २०२४
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) क्रेडिट स्कोर अपडेट करण्यासंबंधी महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. या नव्या नियमांनुसार, आता ग्राहकांचा क्रेडिट स्कोर दर पंधरा दिवसांनी अपडेट केला जाणार आहे. यापूर्वी, हा स्कोर महिन्यातून एकदाच अपडेट केला जात होता, परंतु आता हा कालावधी कमी करण्यात आला आहे.
या निर्णयाचा उद्देश ग्राहकांच्या क्रेडिट प्रोफाईलची अचूकता आणि तातडीने सादर होणे सुनिश्चित करणे हा आहे. त्यामुळे कर्ज देणारे आणि घेणारे दोन्ही पक्ष वेळेवर आणि योग्य माहितीच्या आधारे निर्णय घेऊ शकतील. या बदलामुळे क्रेडिट रिपोर्टिंगमध्ये अधिक पारदर्शकता येईल आणि ग्राहकांना त्यांच्या क्रेडिट स्कोरवर अधिक चांगला नियंत्रण मिळवता येईल.
RBI चे हे निर्देश 26 एप्रिल 2024 पासून लागू होणार आहेत

![]()




