रावेर येथील वाहनाच्या शोरूममधून २५ हजार लांबवले

0
37

रावेरः येथील राम होंडा शोरुमची स्लाईडिंगची खिडकी अज्ञात चोरट्यांनी उघडून काऊंटरच्या ड्रावर मधील २५ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

शहरातील सावदा रोड लगत असलेल्या राम होंडा शोरुमची मागील बाजूची खिडकी उघडून अज्ञात चोरट्याने २५ हजार रुपयांवर डल्ला मारला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील सावदा रोड वरील राम होंडा शोरुमच्या मागील बाजूची स्लाईडिंगची खिडकी उघडून चोरट्याने आत प्रवेश केला. कॅश काऊंटरच्या ड्राव्हर मध्ये ठेवलेले २५ हजार रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केले.

या बाबत शोरुमचे संचालक अमोल महाजन यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्या विरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक कल्पेश आमोदकर करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here