रतन टाटा यांना जळगाव औद्योगिक क्षेत्रातर्फे भावपूर्ण आदरांजली

भारत मातेच्या महान सुपुत्रास भावपूर्ण श्रद्धांजली !

जळगाव (प्रतिनिधी ) ;- भारताच्या औद्योगिक व सामाजिक विश्वातील वंदनीय व्यक्तिमत्त्व, मानवतावादी दृष्टिकोनातून औद्योगिक पायावर समाजकार्याचा कळस रचणारे पद्मविभूषण रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री दुःखद निधन झाले

स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापर्यंत देशाची अनेक स्थित्यंतरे अनुभवलेले, नैतिकता व विश्वासार्हतेचे प्रतीक असलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्व आता काळाच्या पडद्याआड गेलेले आहे
अशा या भारत मातेच्या थोर सुपुत्रास श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जळगाव औद्योगिक क्षेत्रातर्फे श्रद्धांजली सभेचे आयोजन गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या सभागृहात करण्यात आलेले होते.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोदावरी आय एम आर चे संचालक डॉ प्रशांत वारके यांनी केले याप्रसंगी जळगाव एमआयडीसी मधील विविध उद्योगांमधील सुमारे 200 पेक्षा जास्त उद्योजक उपस्थित होते सर्वप्रथम आदरांजली वाहताना एमआयडीसीचे रिजनल ऑफिसर श्री सुनील घाटे यांनी रतनजींच्या आठवणींना उजाळा दिला त्यानंतर लघुउद्योग भारती जळगाव चे अध्यक्ष संतोष इंगळे, जिंदा असोसिएशन जळगाव चे अध्यक्ष रवी लढ्ढा, एम सेक्टर उद्योजक चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष उमेश महाजन तसेच स्मॉल स्केल इंडस्ट्रियल असोसिएशन चे अध्यक्ष चंद्रकांत बेंडाळे व श्याम अग्रवाल, जळगाव मॅट मॅन्युफॅक्चरर असोसिएशन चे अध्यक्ष महेंद्र रायसोनी, लेवा चेंबर ऑफ कॉमर्स व ॲग्रीकल्चर चे अध्यक्ष नितीन इंगळे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व प्लास्टिक रिप्रोसेसिंग असोसिएशन चे विनोद बियाणी पीव्हीसी पाईप मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे श्री कवर लालजी संघवी, लेवा महासंघाचे अध्यक्ष श्री अरुण बोरोले, रोटरी क्लब जळगाव इलाईट चे अध्यक्ष ओम प्रकाश सिंग, विश्व हिंदू परिषदेचे विभागीय प्रमुख श्री भावसार तसेच श्री हरीश मुंदडा या सर्व मान्यवरांनी शब्द सुमनांनी श्रद्धांजली अर्पण केली.

कार्यक्रमाच्या शेवटी गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉक्टर वर्षा पाटील यांनी रतन टाटा यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू कथन केलेत.
आदरणीय रतन टाटांना शेवटी सर्व उद्योजकांनी गुलाब पुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण केली व भारताच्या या औद्योगिक महानायकाला जळगाव औद्योगिक क्षेत्रात तर्फे वंदना देण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here