दादांचे आमदार पुन्हा काकांकडे येणार! काकांचीही परवानगी?

मुंबई, जळगाव समाचार डेस्क;

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मविआ ने राज्यात महायुतीचा अक्षरशः धुव्वा उडवला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यातून राजकीय वर्तुळात अजून एक मोठं वादळ उठले आहे, जेव्हा शरद पवारांनी (Sharad Pawar)अजित पवार गटातील आमदारांच्या परतीच्या मुद्यावर भाष्य केले.
लोकसभा निवडणुकीत अवघी एकच जागा जिंकल्यानंतर अजित पवार गटाने चांगलाच धसका घेतला आहे, त्यानंतर त्यातील काही आमदारांनी स्वगृही अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात जाण्यास उत्सुकता दर्शवली आहे. त्यातच ज्येष्ठ नेते शरद पवारांनी याविषयी बोलतांना सांगितले की, सरसकट निर्णय घेणे योग्य की अयोग्य माहीत नाही पण पक्षाचे हित असेल तर सर्वांचे मत घेऊन यसिच येण्यास उत्सुकांची कार्यक्षमता आणि योगदानाबद्दल विचार करून निर्णय घेतला जाईल. त्याच्या या विधानाने आता राजकीय वर्तुळात पुन्हा वादळ उठले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here