जळगाव समाचार | ८ फेब्रुवारी २०२५
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जळगाव जिल्हा सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ मा. मंत्री तथा अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 5.00 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, अमळनेर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या सदस्य नोंदणी अभियानात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष, विधानसभा क्षेत्र प्रमुख तसेच सर्व सेलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पक्षाचे अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटन विस्तारासाठी आणि पक्षबांधणीसाठी हे अभियान महत्त्वाचे ठरणार असून, जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या अभियानात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.