Monday, December 23, 2024
Homeजळगावराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महानगर महिला काँग्रेसची आढावा बैठक संपन्न...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महानगर महिला काँग्रेसची आढावा बैठक संपन्न…

 

जळगाव समाचार डेस्क;

1 जुलै 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव येथील पक्ष कार्यालयात महानगर महिला काँग्रेसची आढावा बैठक पार पडली. महिला महानगर अध्यक्ष मिनल पाटील यांनी आयोजित केलेल्या बैठकीत जळगांव निरीक्षक अश्विनी मोगल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मिनल पाटील यांनी जळगांव शहरातील केलेल्या कामा बद्दल आढावा दिला.
यावेळी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून बैठकीस प्रारंभ झाला.
यावेळी जिल्हा निरीक्षक अश्विनी मोगल यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले कि, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने पक्षाचे संघटन मजबूत करण्याचे कार्य सर्वांना करायचे आहे. त्याच बरोबर आताच राज्यात जाहीर झालेल्या अर्थसंकल्पातील महिलांच्या हिताच्या योजनांचा सर्व गरजूंपर्यंत प्रचार प्रसार करून पात्र महिलांना योजनेचा लाभ होईल यासाठी कार्य करायचे आहे, जेणेकरून त्यांची हेळसांड व कुणाकडून फसवणूक होणार नाही. त्याच बरोबर अश्विनी मोगल यांनी जळगाव लोकसभा मतदार संघात निवडणुकीत महायुतीच्या विजयी उमेदवार खा स्मिता वाघ यांना मतदार संघातून महिला मतदारांची संख्या जास्त असल्याने त्यांनी सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक केले.
दरम्यान अश्विनी मोगल यांनी जिल्ह्यातील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सर्वस्तरातील बाबी एकून घेतल्या. यावेळी महिला निरीक्षक अश्विनी मोगल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जळगाव लोकसभेचे अध्यक्ष संजय पवार, जळगाव महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील, कार्याध्यक्ष योगेश देसले, मा महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, महानगर महिला जिल्हाध्यक्ष मीनल पाटील, कार्याध्यक्ष लता मोरे, सोनाली देऊळकर, अर्चना कदम तसेच सर्व प्रमुख पदाधिकारी व जळगाव महानगर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होत्या.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page