Sunday, December 22, 2024
Homeजळगाव ग्रामीणजामनेर; दहा मजुरांना विषबाधा, शेतात टाकत होते रासायनिक खत...

जामनेर; दहा मजुरांना विषबाधा, शेतात टाकत होते रासायनिक खत…

 

जळगाव समाचार डेस्क;

सध्या शेतीतील कामे जोराने सुरु असून मुबलक पावसामुळे शेतकरीही सुखावला आहे. त्यामुळे शेतात पिका पाण्यासाठी त्यांचे प्रयत्न जोमाने सुरु आहे. मात्र अश्यातच जामनेर तालुक्यातील वाकोद येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. मक्याच्या शेतात रासायनिक खत टाकत असताना दहा मजुरांना विषबाधा झाल्याचे वृत्त आहे. दि. 9 रोजी दुपारी तीन वाजता ही घटना घडली असून. या 10 मजुरांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, त्यांची प्रकृतीत सुधारणा असल्याने त्यांची रुग्णालयातून सुट्टी करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील वाकोद येथे महिला वर्ग शेतात मजुरीसाठी गेल्या होत्या. दि. 9 जुलै रोजी मकाच्या पिकाला रासायनिक खत टाकत असतांना त्यांना दुपारी ३ वाजेच्या सुमारास रासायनिक खतामुळे सर्व मजूर महिलांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे तातडीने सर्व महिलांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांच्यावर प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांची रुग्णालयातून सुटका करण्यात आली. या घटनेत सर्व मजूर महिलांची प्रकृती स्थिर आहे. याबाबत पोलिसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.
यात द्वारकाबाई अशोक जोशी (३२), पूजा विजय जोशी (२९), ज्योती विकास जोशी (२८), लताबाई मेघराज जोशी (६५), उषा संतोष जोशी (३०), गुंताबाई उत्तम जोशी (२२), मंगलाबाई शिवाजी जोशी (४०), उर्मिला शिवाजी जोशी (२०), माधुरी शिवाजी जोशी (१४) आणि छाया गजानन जोशी (४०) या महिला मजुरांना त्रास झाला होता.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page