जळगाव समाचार | २८ फेब्रुवारी २०२५
रायगड जिल्ह्यातील पेण येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पेण पोलिसांनी मनिष म्हात्रे या तरुणाला अटक केली असून, त्याच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रायगड जिल्हा भाजपा महिला सरचिटणीस आणि रायगड जिल्हा शांतता कमिटी सदस्या वंदना म्हात्रे यांचा मुलगा मनिष म्हात्रेला पोलिसांनी अटक केली आहे. मनिष म्हात्रेने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले असून त्याच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाल करण्यात आला आहे. पेण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या घटनेमुळे रायगडमध्ये खळबळ उडाली आहे.
वंदना म्हात्रे यांचा मुलगा मनिष म्हात्रेने १५ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पेण पोलिसांनी मनिष म्हात्रेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मे २०२४ मध्ये सोशल मीडियाद्वारे पीडित मुलीची ओळख आरोपीशी झाली. नंतर सप्टेंबर २०२४ पासून त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले, अशी माहिती तक्रारीत नमूद आहे. तसेच, धमकी देऊन त्याने मुलीवर दबाव टाकल्याचा आरोप आहे.
पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पेण पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करून पुढील चौकशी सुरू आहे.