जळगाव समाचार डेस्क| १४ सप्टेंबर २०२४
पुण्यातील बालाजी नगरमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेत सात वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ७८ वर्षीय आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. मधुकर पीराजी थिटे असे आरोपीचे नाव असून, तो पीडित मुलीच्या घराशेजारी राहत होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, मधुकर थिटे याने घराशेजारी राहणाऱ्या सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला. या घटनेनंतर मुलीने गोष्ट कोणाला सांगू नये म्हणून आरोपीने तिला गळ्यावर चाकू ठेवून धमकी दिली होती. मात्र, मुलीला शारीरिक वेदना जाणवू लागल्यानंतर तीने धाडसाने ही बाब तिच्या आजीला सांगितली.
त्यानंतर या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली आणि मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीत अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुणे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. सध्या मुलीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.