जळगाव समाचार डेस्क| १७ ऑगस्ट २०२४
कोलकाता येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा फिसिओथेरेपिस्ट असोसिएशनच्या वतीने कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले. या आंदोलनाद्वारे पीडित डॉक्टर भगिनीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सदर कँडल मार्चमध्ये अनेक फिसिओथेरेपिस्ट, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कोलकाता येथील घटनेने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर या कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. सहभागी सर्वांनी एकत्र येत शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवला आणि समाजातील वाईट प्रवृत्तींचा धिक्कार केला.
या कँडल मार्चद्वारे पीडित डॉक्टर भगिनीला श्रद्धांजली अर्पण करताना सर्वांनी तिच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून कठोर कायदे तयार करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
Video Link