जळगाव समाचार डेस्क | १२ फेब्रुवारी २०२५
विवाहितेवर अत्याचार करून फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी तसेच पती व मुलाला ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळमधील ३२ वर्षीय महिलेवर जळगाव शहरातील हॉटेल प्रगती पॅलेस येथे विनोद रामचंद्र पाटील (रा. श्रावण नगर, जळगाव) याने अत्याचार केला. त्यानंतर त्याने महिलेचे फोटो इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून आणि तिच्या पतीकडून पैसे घेतले. एवढेच नव्हे, तर पती आणि मुलाला ठार मारण्याची धमकीही दिली.
हा प्रकार ८ जुलै २०२२ ते १२ जून २०२३ दरम्यान घडला असून पीडित महिलेने १० फेब्रुवारी २०२५ रोजी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर या करत आहेत.