हृदयद्रावक: रक्षाबंधनाच्याच दिवशी एकुलत्या एक भावाचा निंबादेवी धरणात बुडून मृत्यू…

 

जळगाव समाचार डेक| २० ऑगस्ट २०२४

यावल तालुक्यातील येथील निंबादेवी धरणात सोमवारी दुपारी २० वर्षीय तरुणाचा पाय घसरून पाण्याच्या डोहात पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वेदांत सुवर्णसिंग पाटील (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी एकुलता एक मुलगा गेल्याने कुटुंबियांचा आक्रोश.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, निमगाव येथील रहिवासी असलेला वेदांत आपल्या आई-वडील आणि बहिणीसोबत येथे वास्तव्यास होता. सध्या तो पदवी शिक्षणाच्या शेवटच्या वर्षाला होता. रक्षाबंधनाच्या निमित्ताने सुट्टी असल्याने सोमवारी दुपारी आपल्या मित्रांसोबत निमगावपासून जवळ असलेल्या निंबादेवी धरणावर फिरायला गेला होता. दुपारी चार वाजताच्या सुमारास त्याचा पाय घसरून तो पाण्यात पडला. या घटनेनंतर त्याने पुन्हा वर येण्याचा प्रयत्न केला नाही, ज्यामुळे त्याच्या मित्रांनी लगेचच मदतीची हाक दिली.त्याला पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने तातडीने बाहेर काढण्यात आले, परंतु जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
वेदांत हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद पोलिसांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here