जळगाव समाचार डेस्क | ८ नोव्हेंबर २०२४
महाराष्ट्र संस्कृतीक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित होणाऱ्या 63 व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या जळगाव केंद्रासाठी प्रा. संदीप तायडे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जळगावच्या नाट्य क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्व असलेल्या प्रा. तायडे यांच्याकडे आता या स्पर्धेचे समन्वयाचे महत्त्वाचे कार्य असेल. त्यांच्याकडे शासन आणि स्पर्धकांमध्ये समन्वय साधून स्पर्धा सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
प्रा. तायडे यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. त्यांच्या अनुभवामुळे स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडली जाईल, असा विश्वास नाट्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.