आ. राजूमामा भोळे यांनी सहकुटुंब घेतली माजी मंत्री सुरेशदादांची भेट…

 

जळगाव समाचार डेस्क | २ नोव्हेंबर २०२४

दीपोत्सवानिमित्त शुक्रवारी सकाळी १ नोव्हेंबर रोजी आ. राजूमामा उर्फ सुरेश भोळे यांनी सहकुटुंब माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची भेट घेत आशीर्वाद घेतले.

आमदार भोळे यांनी पत्नी तथा माजी महापौर सीमा भोळे, मुलगा विशाल भोळे, सुन डॉ. जुही भोळे व मोहित भोळे यांच्यासह सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

जळगाव शहरात सर्वांगिण विकास कसा झाला पाहिजे, शहर मतदारसंघातील कोणकोणत्या विषयांवर विशेष लक्ष केंद्रीत केले पाहिजे, तसेच विविध विषयांवर वडिलधाऱ्या दादांनी आशीर्वादपर मार्गदर्शन दिले.

हा स्नेहबंध उद्याच्या जळगाव शहराच्या सर्वागिण विकासासाठी अत्यंत मोलाचा आणि मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास आ. राजूमामा भोळे यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here