आ. राजूमामा भोळे यांनी सरदार पटेल यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून केले अभिवादन

जळगाव समाचार डेस्क | ३१ ऑक्टोबर २०२४

भारताचे लोहपुरुष व भारताचे प्रथम गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जळगाव महानगरपालिका इमारतीत उभारण्यात आलेल्या त्यांच्या पुतळ्याला आमदार राजूमामा भोळे यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली. भारतरत्न सरदार पटेल जयंती उत्सव समितीतर्फे आयोजित या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी पटेल यांच्या विचारांपासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

जळगाव महानगरपालिकेच्या इमारतीखाली सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्यांच्या जयंती निमित्त मध्यरात्री १२ वाजता आ. भोळे यांनी पुष्पहार अर्पण करून सरदार पटेल यांना वंदन केले. यावेळी बोलताना आ. भोळे म्हणाले की, “लोहपुरुष सरदार पटेल यांचे कार्य अतुलनीय असून त्यांच्या विचारांपासून समाजाने प्रेरणा घेत देशहितासाठी कार्य करावे.”

या कार्यक्रमाला माजी महापौर ललित कोल्हे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील, डॉ. वीरेन खडके, डॉ. वैभव पाटील, कुंदन काळे, अजित राणे, सुनील महाजन, पियुष कोल्हे, चंदन कोल्हे, शंतनु नारखेडे, मिलिंद चौधरी, ललित चौधरी, महेश चौधरी यांच्यासह विविध मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here