जळगाव; जळगाव समाचार डेस्क;
लोकसभेच्या धर्तीवर जळगावात भाजप तर्फे उमेदवार बदलाचे जोरदार वारे वाहू लागल्याचे चित्र आहे. उमेदवारी साठी युवा फळीतील अनेकांची नावेही आता समोर येऊ लागली आहेत. त्यामुळे जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) (Rajumama Bhole) यांची आमदारकीची Hat-trick होणार नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, मार्केटींग फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम (Ujjval Nikam) यांचे पुतणे रोहित निकम व माजी खासदार डॉ. उल्हास पाटील (Dr. Ulhas Patil) यांच्या कन्या तथा गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील (Dr.Ketaki Patil) यांची नावे अग्रस्थानी असल्याच्या चर्चा आहे.
राज्यात मविआ कडून भाजप आणि मित्र पक्षांना अनेक ठिकाणी सपाटून पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे विधानसभेत भाजप आता कार्यकुशल प्रतिनिधींच्या शोधात असल्याचेही दिसत आहे. ज्यांचा मागील कार्यकाळात आलेख चढता राहिला त्यांनाच भाजपा पुढेही संधी नक्कीच देईल. मात्र राजू मामा यांच्या बाबतीत जळगाव विधानसभा मतदारसंघात यांच्याबद्दलही नाराजी वाढली आहे.
आपल्या दोन टर्मच्या कार्यकाळात केवळ समारंभांमध्ये हजेरी लावण्या पलीकडे त्यांचे नेमके कार्य काय? हा सवाल उपस्थित झाला. मतदारसंघात तरुण वर्ग हा शहरातून मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी इतरत्र स्थलांतर करतच आहे, तरुणांच्या रोजगारासाठी कसलीही हालचाल त्यांच्याकडून दिसून आली नाही. सोबतच शहरातील गाळेधारकांचा प्रश्न अद्यापही मार्गी लागला नसल्यानं शहरात व्यापारी, हॉकर्स ही त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता त्यांचा पत्ता कट होतो कि काय? असे चित्र आहे. सरतेशेवटी पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.