भाऊबीजनिमित्त राजूमामा भोळे यांचे औक्षण; महिलांकडून विजयासाठी शुभेच्छा


जळगाव समाचार डेस्क| ४ नोव्हेंबर २०२४

शहराचे आमदार राजूमामा भोळे यांचा भाऊबीजनिमित्त गेंदालाल मिल परिसरातील तक्षशिला बुद्ध विहार येथे महिलांनी औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम ३५८ ग्रुपचे संस्थापक अजय गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमात माजी नगरसेवक राजू मराठे, संजय शिंदे, विनय चौधरी यांच्यासह स्थानिक महिला, पुरुष नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. भाऊबीज सणाचे औचित्य साधून महिलांनी राजूमामांचे औक्षण केले आणि त्यांना दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.

राजूमामा भोळे यांनी बुद्ध विहारात भगवान गौतम बुद्ध यांना वंदन करून अभिवादन केले. कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी त्यांच्याशी संवाद साधत स्थानिक प्रश्न मांडले, ज्यावर लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन आ. भोळे यांनी दिले.

आध्यात्मिक साधनेतून लाभते मनःशांती : राजूमामा भोळे

सिखवाल समाजातर्फे आयोजित अन्नकुट महोत्सवात आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांशी संवाद साधत आ. भोळे यांनी आध्यात्मिक साधनेचे महत्त्व विशद केले. त्यांनी महर्षी ऋष्य शृंग यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन केले.

आध्यात्मिक साधनेतून जीवनात मनःशांती प्राप्त होते, असे मत व्यक्त करून आ. भोळे यांनी नागरिकांना भगवंताच्या सानिध्यात थोडा वेळ घालवण्याचा सल्ला दिला. यावेळी नागरिकांनी त्यांच्या कार्याचा गौरव करून आगामी निवडणुकीत पुन्हा विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here