जळगावच्या विकासासाठी जैन आणि भोळे यांची महत्त्वपूर्ण चर्चा

 

जळगाव समाचार डेस्क | १७ नोव्हेंबर २०२४

जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा वाटा उचलण्यासाठी ज्येष्ठ उद्योजक आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे चेअरमन श्री. अशोकभाऊ जैन आणि भारतीय जनता पार्टी-महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. सुरेश दामु भोळे ऊर्फ राजूमामा यांनी काल सविस्तर चर्चा केली.

शनिवार, दि. 16 नोव्हेंबर 2024 रोजी जैन हिल्स येथे झालेल्या या चर्चेत जळगावच्या ‘व्हिजन डॉक्युमेंट 2024-2029’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर विशेष भर देण्यात आला. राजूमामा भोळे यांनी आगामी पाच वर्षांत शहराच्या कायापालटासाठी प्रस्तावित योजनांची माहिती दिली, तर अशोकभाऊ जैन यांनी त्यावर मार्गदर्शन करत जळगावला औद्योगिक, सामाजिक, व्यावसायिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या सक्षम करण्याचे उपाय सुचवले.

या चर्चेत औद्योगिक वाढ, सार्वजनिक दळणवळण सुधारणा, पर्यावरण संवर्धन, शैक्षणिक आणि क्रीडा सुविधांचा विस्तार, तसेच ऊर्जा क्षेत्रातील प्रकल्पांवर विचारविनिमय झाला. याशिवाय, जळगावच्या जागतिक ओळख निर्माण करण्याच्या दिशेने भरीव पाऊल उचलण्यासाठी या दोघांनी काही महत्त्वाचे मुद्दे निश्चित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here