जळगाव, जळगाव समाचार डेस्क;
महाराष्ट्रासह देशभरात मान्सूनने वेळेआधी हजेरी लावली. आणि भयंकर उकड्नार्या वातावरणापासून सर्वांना दिलासा मिळाला. मात्र हवेच्या दाबाची स्थिती अनुकूल नसल्याने मौसमी वाऱ्यांचा वेग मंदावला आहे. यामुळे खंड पडण्याची शक्यता आहे. अशी अपडेट मान्सूनबाबत भारतीय हवामान खात्याने मोठी दिली आहे. त्यामुळे तब्बल पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात पाऊस दांडी मारू शकतो.
मान्सूनच्या आगमनाने सर्वसामान्यांना तर आनंद झालाच याहून अधिक आनंद हा बळीराजाला झाला. पावसाच्या येण्याने शेतकऱ्यांमध्ये पेरणीची लगबग सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मात्र ऐन पेरणीच्या हंगामावेळी हवामानाच्या लापान्दावाच्या खेळाणे पाऊस हा सुट्टीवर जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजनुसार, पुढील ५ दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड पडू शकतो. २० जूननंतरच राज्यात पावसाचा जोर वाढेल, असंही हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. जमिनीत ६ इंच खोलवर ओल गेल्याशिवाय बियाणे रोवू नये, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.