राज्यात पुढील चार-पाच दिवस वळवाच्या पावसाचा अंदाज; जळगाव ४४ अंशावर…

जळगाव समाचार | ३ मे २०२५

राज्यात शनिवारपासून पुढील चार ते पाच दिवस वळवाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात येण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

यलो अलर्टची कालमर्यादा:
• कोकण: ५ ते ८ मे
• मध्य महाराष्ट्र: ३ ते ८ मे
• मराठवाडा: ३ ते ८ मे
• विदर्भ: ३ ते ६ मे

दरम्यान, राज्यात उकाडा कायम असून, जळगाव शहरात ४४.२ अंश सेल्सियस तापमान पोहोचल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

राज्यातील काही प्रमुख शहरांचे कमाल तापमान (२ मे)
• अकोला: ४४.५ अंश
• जळगाव: ४४.२ अंश
• सोलापूर: ४४.१ अंश
• मालेगाव: ४२.२ अंश
• नाशिक: ४० अंश
• औरंगाबाद (छ. संभाजीनगर): ४२ अंश
• बीड: ४२.९ अंश
• अमरावती: ४२.८ अंश
• पुणे: लोहगाव ४३, शिवाजीनगर ४१.२ अंश
• मुंबई (कुलाबा): ३४.१, सांताक्रूझ: ३३.९
• कोल्हापूर: ३८.५, महाबळेश्वर: ३३.१

राज्यातील उन्हाचा जोर कायम असतानाच पावसाच्या आगमनाने काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here