जळगाव समाचार डेस्क| २९ जुलै २०२४
यंदाचा पाऊस (Rain) हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह सर्वांनाच सुखावणारा ठरतोय. मात्र गेल्या आठवड्यापासून पावसाने जिल्ह्याला अक्षरशः ओलेचिंब करून ठेवले आहे. अनेक ठिकाणी गावांमध्ये रस्ते वाहून गेल्याच्या घटना देखील समोर आल्यात तर काहीठिकाणी पाणी भरल्याने सर्वसामान्यांचे हाल झाल्याचे दिसून आले. मात्र अजूनही पावसाच्या रिपरिप पासून जिल्ह्याला अजूनतरी दिलासा मिळणार नसल्याचे हवामान खात्याने अंदाजात वर्तवले केले आहे. (Jalgaon)
ढगाळ वातावरणामुळे पाऊस सातत्याने सुरु आहे. त्यामुळे परिसरात मच्छरांची वाढ झाली आहे त्यामुळे आरोग्याच्या समस्या व साठीच्या रोगांनी डोके वर काढली आहेत. भिजपावसामुळे शेती कामांना अडचणीही निर्माण झाल्या आहेत. दरम्यान आज दि.२९ व ३० रोजी जिल्हाभरात विविध ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता असून बुधवार दि. ३१ रोजी देखील ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे आता पिके करपण्याची तसेच खरीप पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा पाऊस ऑगस्ट महिन्याच्या प्रथम आठवड्यातही अश्याच स्वरूपाचा कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने अदाज वर्तवला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी त्याप्रमाणे आपले कामाचे नियोजन करूनच पुढची पावले उचलणे योग्य राहिल.

![]()




