रेल्वेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू

0
48

पाचोरा (प्रतिनिधी) :- भरधाव वेगाने जाणाऱ्या रेल्वेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील दुसखेडा गावाजवळील रेल्वेलाइनवर उघडकीस आली आहे. याबाबत पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रवीण शांताराम पाटील (४०, रा. दुसखेडा ता. पाचोरा) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. प्रवीण हे दि. २७ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास रेल्वे लाइन ओलांडत असताना त्यांना अपलाइनवरून भरधाव वेगाने जाणाऱ्या रेल्वेचा धक्का लागला. त्यात पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोकों संतोष राजपूत, पोकों प्रकाश शिवदे हे घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस हवालदार दिलीप वाघमोडे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here