जळगाव समाचार डेस्क | २२ जानेवारी २०२५
जळगाव जिल्ह्यात आज सायंकाळच्या सुमारास मोठी रेल्वे दुर्घटना घडली. पुष्पक एक्सप्रेसला परधाडे रेल्वे स्थानकाजवळ अचानक आग लागल्याचे वृत्त पसरल्याने जीव वाचवण्यासाठी अनेक प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या. मात्र, दुर्दैवाने समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेस रेल्वेमुळे अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेमुळे मोठी हानी झाली असून, मदतकार्य सुरू आहे. प्रशासनाकडून तपास सुरू असून दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.
(सविस्तर वृत्तासाठी जुळून रहा जळगांव समाचार सोबत…)