Monday, December 23, 2024
Homeक्राईमधक्कादायक; पुण्यात 14 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या हाती टँकरचे स्टेअरिंग; अनेकांना चिरडले...

धक्कादायक; पुण्यात 14 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या हाती टँकरचे स्टेअरिंग; अनेकांना चिरडले…

 

पुणे, जळगाव समाचार डेस्क;

पुणे शहरातील पुन्हा एका अल्पवयीन मुलाच्या हातून मोठा अपघात झाला आहे. (Accident) यावेळी कार च्या जागी १४ वर्षीय अल्पवयीन मुलगा चक्क टँकर चालवत होता. त्याने पळवलेल्या सुसाट टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नीसह व्यायामासाठी निघालेले लहान मुलेही जखमी झाली आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेचे अधिकारी संतोष ढुमे आणि त्यांच्या पत्नी हे दुचाकीवरून वानवाडी परिसरातून जात होते. त्यांच्या तालमीत शिकणाऱ्या मुली व्यायामासाठी रस्त्यावरून धावत होत्या. त्याचवेळी अचानक पाठीमागून भरधाव वेगात एक टँकर आला. काही क्षणातच या टँकरने ढुमे यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जबर होती, की ढुमे यांच्या पत्नी दुचाकीवरून खाली कोसळल्या. दैव बलवंतर असल्याने त्यांच्या अंगावरून टँकरचे चाक गेले नाही. पुढे या टँकरने मॉर्निंग वॉकला निघालेल्या लहान मुलांनाही धडक दिली, ज्यात मुळे जखमी झाले आहेत. शहरातील वानवाडी परिसरात शनिवारी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.
यात टँकर चक्क १४ वर्षांचा मुलगा चालवीत असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अल्पवयीन मुलासह त्याच्या वडिलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अल्पवयीन मुलांच्या हातात वाहनाने अपघात होणे हे पुन्हा एकदा रस्ते सुरक्षा यंत्रणेचा गलथानपणा आणि याकडील दुर्लक्ष असल्याचेही निदर्शनास आणून देते.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page