प्रभाग ९ मध्ये जयश्री राहुल पाटील यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

जळगाव समाचार | ११ जानेवारी २०२५

जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील भाजपाच्या अधिकृत उमेदवार जयश्री राहुल पाटील यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रचारादरम्यान त्यांनी घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत प्रभागाच्या विकासाविषयी आपली भूमिका मांडली.

यावेळी प्रभागातील रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण, आर.सी.सी. गटारी व नाले ड्रेनेज लाईन, रमाई आवास, वाल्मिक आवास तसेच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांची उभारणी, महिला बचत गटांना प्रोत्साहन, दिव्यांग व माजी सैनिकांसाठी व्यावसायिक गाळ्यांची सोय, लहान मुलांसाठी बालोद्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी उद्यान आणि संपूर्ण प्रभागात स्ट्रीट लाईट बसविणे आदी विकासकामे प्राधान्याने राबविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

“आपला एक तास मतदानासाठी, आमची पाच वर्षे सेवेसाठी” असे भावनिक आवाहन करत जयश्री पाटील यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या लोकाभिमुख भूमिकेमुळे प्रभागातील मतदारांमध्ये सकारात्मक चर्चा होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here