पत्नीच्या नावाने पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करुन २ वर्षांत मिळवा इतका फायदा…

जळगाव समाचार | १६ एप्रिल २०२५

पोस्ट ऑफिस आता केवळ पत्र व्यवहारापुरतं मर्यादित न राहता, बँकिंग सेवांचाही एक मजबूत पर्याय बनलं आहे. बचत खात्यांप्रमाणेच पोस्ट ऑफिसमध्ये फिक्स्ड डिपॉझिट (FD) सारखी योजना देखील आहे, ज्याला ‘टाइम डिपॉझिट’ (TD) असं म्हटलं जातं.

पोस्ट ऑफिसमध्ये १, २, ३ आणि ५ वर्षांसाठी TD खाते उघडता येतं. सध्या २ वर्षांच्या TD वर ७ टक्के व्याज दर लागू आहे. या योजनेत किमान १ हजार रुपये जमा करता येतात आणि जास्तीत जास्त गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही.

देशातील अनेक नागरिक कर वाचवण्यासाठी किंवा सुरक्षित गुंतवणुकीसाठी आपल्या पत्नीच्या नावाने अशी खाती उघडतात.

जर एखाद्याने आपल्या पत्नीच्या नावाने पोस्ट ऑफिस TD योजनेत २ वर्षांसाठी २ लाख रुपये जमा केले, तर मॅच्युरिटीच्या वेळी एकूण २,२९,७७६ रुपये मिळतील. यामध्ये मूळ गुंतवणूक २ लाख आणि त्यावर मिळणारे व्याज २९,७७६ रुपये यांचा समावेश आहे.

पोस्ट ऑफिस TD ही सुरक्षित आणि निश्चित व्याजदर असलेली योजना आहे. एकदा गुंतवणूक केली की, त्यावर कोणतेही व्याजदराचे चढ-उतार होत नाहीत. त्यामुळे जोखीम टाळू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here