जळगाव समाचार | २८ एप्रिल २०२५
रिझर्व्ह बँकेनं (RBI) रेपो दरात कपात केल्यानंतर सर्वच बँकांनी FDवरील व्याजदर कमी केले आहेत. त्यामुळे FDवर कमी परतावा मिळू लागला आहे. अशावेळी पोस्ट ऑफिसच्या बचत योजना चांगला पर्याय ठरू शकतात. या योजना सुरक्षित असून FDपेक्षा जास्त परतावा देतात. चला जाणून घेऊया अशा ५ प्रमुख योजनांबद्दल:
१. सुकन्या समृद्धी योजना
मुलींच्या भविष्यासाठी खास योजना! दरवर्षी किमान ₹२५० आणि कमाल ₹१.५ लाख गुंतवणूक करता येते. ८.२०% व्याजदर मिळतो आणि कलम ८०सी अंतर्गत कर सवलतही आहे.
२. ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)
६० वर्षांवरील नागरिकांसाठी योजना. ₹१,००० ते ₹३० लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते. ५ वर्षांच्या ठेवीवर ८.२०% व्याज आणि कर सवलत मिळते.
३. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF)
किमान ₹५०० आणि कमाल ₹१.५ लाख पर्यंत गुंतवणूक करता येते. ७.१०% व्याज, १५ वर्षांची मुदत, आणि करमुक्त परतावा मिळतो.
४. किसान विकास पत्र (KVP)
₹१,००० पासून कोणतीही मर्यादा नाही. ७.५०% व्याज मिळते. अडीच वर्षांनंतर पैसे काढता येतात, मात्र कर सवलत नाही.
५. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC)
५ वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक. किमान ₹१,००० पासून सुरुवात करता येते. ७.७०% व्याज आणि कलम ८०सी अंतर्गत कर सवलत मिळते.