नशिराबादमध्ये पोषण आहारात मेलेला उंदीर आढळल्याने खळबळ…

जळगाव समाचार डेस्क;

जळगाव (Jalgaon) शहरालगत असलेल्या नशिराबाद मधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. अंगणवाडी च्या पोषण आहाराच्या बंद पाकिटातून मेलेला उंदीर आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तेजस्वी देवरे नामक महिला या स्वयंपाक करताना त्यांनी तांदूळ घेण्यासाठी हे पोषण आहाराच्या मिक्स तांदळाचे पाकीट फोडले असता त्यात हा उंदीर आढळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. यासर्वांमुळे प्रशासनाला मुलांच्या आरोग्याची काळजी आहे की नाही ? हा सवाल उपस्थित केला जात आहे. याविषयी शासनाने संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी असा एकच सूर समाजमनातून उमटतो आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here