जळगाव समाचार डेस्क| ५ सप्टेंबर २०२४
येत्या गणेश उत्सव व ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जळगावच्या उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाने १९ जणांना नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये संबंधित व्यक्तींना आगामी सणकाळात शहरातून बाहेर काढण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
जळगाव शहर पोलीस निरीक्षकांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ (२) अंतर्गत या १९ जणांविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव सादर केला आहे. या व्यक्तींच्या विरोधात विविध गुन्हे दाखल असल्याने, सणांच्या काळात सार्वजनिक शांततेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नोटीस प्राप्त व्यक्तींना ५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. जर ते या सुनावणीस हजर राहिले नाहीत, तर एकतर्फी कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
सणांदरम्यान सार्वजनिक शांततेसाठी प्रशासनाची तयारी
आगामी सणकाळात जळगाव शहरातील शांतता कायम ठेवण्यासाठी प्रशासनाने आधीच सावध पावले उचलली आहेत. गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलाद या सणांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांनी सर्व संभाव्य घटकांवर लक्ष ठेवले आहे.
यांना पाठवल्या नोटीस…
१. आकाश मनोहर वाघ रा. शाहूनगर, ता. जळगाव
2. महेश माधवराव पवार रु. नचीपेठ, ता. जळगाव
3. विनोद अशोक कुमार मुंडा रु. नवीपेठ, ता. जळगाव
४. अमोल राजेंद्र जोशी रा. नविपेठ, ता. जळगाव
५. मनिष श्यामसुंदर झंवर रा. नविपेठ, ता. जळगाव
६. सुनिल सुरेश जोशी रा. नविपेठ, ता. जळगाव ७. चंद्रकांत बळीराम पाटील रा. कुसुंबा, ता. जळगाव
८. सागर भिमराव सोनवणे रा. जळगाव
९. अजयकुमार सुरेशचंद्र गांधी रा. नविपेठ, ता. जळगाव
१०. गोविंद शामसुंदर पंडीत रा. नविपेठ, ता. जळगाव
11. गौरव उमेश सांखला, रा.नवीपेठ, ता. जळगाव
१२. कल्पेश कैलास सोनवणे रा. लिधुरवाडा जैनाबाद, ता. जळगाव
१३. कैलास नारायण सोनवणे रा. लिघुरवाडा, जैनाबाद, ता. जळगाव
14. आयुष अजय गांधी रु. नवीपेठ, ता. जळगाव
१५. गौरव लक्ष्मीकांत राणा रु. बळीराम पेठ, ता. जळगाव
१६. रुपेश राजेंद्र पाटील रा. बळीराम पेठ, ता. जळगाव
१७. राहुल गजानन घारेपडे रा. बळीराम पेठ, ता. जळगाव
१८. विपीन दीपक पवार रु. बळीराम पेठ, ता. जळगाव
19. अश्विन सुरेश भोळे रु. बळीराम पेठ, ता. जळगाव

![]()




