संजय वर्मा यांची राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती


जळगाव समाचार डेस्क | ५ नोव्हेंबर २०२४

राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्याच्या पोलीस महासंचालकपदावर बदल केला आहे. निवडणूक आयोगाने राज्याच्या सध्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली केल्यानंतर, त्यांच्या जागी वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांची राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

संजय वर्मा हे सध्या डीजीपी (कायदेशीर आणि तांत्रिक) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या नियुक्तीचा निर्णय घेताना राज्याचे मुख्य सचिवांनी निवडणूक आयोगाकडे तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे पाठवली होती. या यादीत मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस सेवेतले वरिष्ठ अधिकारी संजय वर्मा आणि रितेश कुमार या अधिकाऱ्यांचा समावेश होता.

निवडणूक आयोगाने संजय वर्मा यांना राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्त करण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे निवडणुकीच्या काळात कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिस दलाच्या नेतृत्वात महत्त्वपूर्ण बदल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here